मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारच्या समितीच्या शिफारशी नुसार सरकारने पदोन्नतीमधील आरक्षणही रद्द केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयला विरोध होत असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही राज्य सरकारचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ देण्याची मागणी देखील वंचितच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऑनलाईन बैठकीची मागणी केली आहे. या बैठकीला वंचितचे महत्त्वाचे ३ नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, उपाध्यक्ष धनराज वंजारी, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर यांचा समावेश आहे.
Maharashtra Govt GR cancelling Reservation in promotion is utterly unjust. There is intense resentment among the backward classes of Maharashtra. Therefore, I request the Chief Minister @CMOMaharashtra @OfficeofUT to give us a suitable time to discuss the issue in detail. pic.twitter.com/7hVxm7gBgt
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 10, 2021
मराठा समाजाला खुष करण्यासाठी सरकार मागसवर्गीय समाजाचा बळी देत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी या आधी केला होता. त्यांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आता राज्य सरकारने चर्चा करावी, अशी मागणी केली आहे. राज्यातही विविध ठिकाणी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींकडून कौतुक, पण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडले’, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल
- ‘मोदींनी राज्यपालांना कार्यमुक्त करून मंत्रीपद द्यावे’, नवाब मलिकांचा टोला
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे


