मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेतली. दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी कौतुक केले. तर दुसरीकडे राज्यात कोरोना लसींच्या तुटवड्यावरून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे.
यावर भाजप नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, हा तुटवडा राज्य सरकारकडून जाणुनबुजून तयार केला जातोय. केद्र सरकारने लसींचा मुबलक साठा पाठवला असून ठाकरे सरकार जाणुनबुजून तुटवडा निर्माण करतंय, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपांना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्त्युत्तर दिलेय.
एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत , आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये. अशी 1/2 https://t.co/ciFSw4xSYX
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 10, 2021
‘एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत. आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की, त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये. अशी वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय’, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
तसेच “केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही. वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो”, असा टोला त्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींनी राज्यपालांना कार्यमुक्त करून मंत्रीपद द्यावे’, नवाब मलिकांचा टोला
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर

