🕒 1 min read
मुंबई: देशाचा पुढील राष्ट्रपती कोण होणार यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षाने यशवंत सिन्हा (Yashwant Sinha ) यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली आहे तर भाजपच्या अर्थातच एनडीएकडून आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना तसेच इतर अनेक पक्षांनी द्रौपदी यांना पाठींबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसवर निशाणा साधत टीका केली आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी माझ्याकडे एकही मत नाही. मात्र काँग्रेस पक्षाकडून दिवाळखोरीचं राजकारण चालू असून कॉंग्रेस अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर शरण गेला आहे. अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. “मी अगोदरच म्हणालो होतो की, राष्ट्रपती पदाचा उमेदवार आदिवासी वर्गातला हवा. एकीकडे ते स्वत:ला विचारांचे ठेकेदार समजतात. पण दुर्दैवाने ते अक्कलशून्य आहेत.”, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी-प्रकाश आंबेडकर
“यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची विनंती करत आहे कारण, अनेक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे सदस्य मॅडम द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी सामील होत आहेत.”, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Deepali Sayed : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची येत्या दोन दिवसात भेट होणार; दीपाली सय्यदांचा मोठा दावा
- PV Sindhu : शाब्बास पीव्ही सिंधू! पटकावलं सिंगापूर ओपन २०२२ मध्ये विजेतेपद
- Mahesh Tapase | मुख्यमंत्र्यांनी जाणून – बुजून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी थांबवला – महेश तपासे
- CM Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरेंच्या नावे असणारी ‘ती’ योजना कार्यान्वित करणार; शिंदे सरकारचा निर्णय
- Deepali Sayed : संजय राऊत, शांतता घ्या, ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्या; दिपाली सय्यद यांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
