Share

प्रधानमंत्री आवास योजना; हिंगोली मराठवाड्यात अव्वल!

Published On: 

हिंगोली :कोरोना महामारीच्या काळात ही जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत योजनेमध्ये ३१ मार्चपर्यंत मराठवाड्यात सर्वात जास्त घरकुलांचे काम पूर्ण करून मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर घरकुलांचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी हाती घेतलेल्या महाआवास अभियानाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मराठवाड्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजनेमध्ये घरकुलांची जास्तीत जास्त कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाआवास अभियान राबविण्यात आले असून या अभियानात घरकुलांच्या बांधकामावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्ह्याने ११ हजार ७७ घरकूल बांधकामाच्या उदिष्टापैकी ६ हजार ७११ घरकुलांचे काम पूर्ण करून मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याने १० हजार ९६८ पैकी ६ हजार ५१८, परभणी ७ हजार १७१ पैकी ४ हजार १५५, उस्मानाबाद ६ हजार ११८ पैकी ३ हजार ४५९, औरंगाबाद २२ हजार १४३ पैकी ११ हजार ६१४, बीड १९ हजार ७१० पैकी ९ हजार ६७३, जालना १३ हजार ७१५ पैकी ६ हजार ३४९ तर नांदेड जिल्ह्यात ५० हजार ०८३ पैकी १९ हजार ९४७ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. औरंगाबाद विभागात ७७ हजार १८७ घरकुलांच्या कामापैकी ४२ हजार १३० कामे पूर्ण झाली आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!