Share

‘प्रहार’ची दमदार एन्ट्री; अमोल मिटकरींचा त्यांच्याच गावात पराभव

Published On: 

अकोला : अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना धक्का बसला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पक्षाने जिल्हा परिषदेत धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. अकोट तालुक्यातील कुटासा मतदार संघातून प्रहार पक्षाचे उमेदवार स्फूर्ती निखिल गावंडे यांनी विजय मिळवला आहे. अमोल मिटकरी यांच्या गावातच त्यांच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं. प्रहार पक्षाने अकोला जिल्हा परिषदेत आतापर्यंत एकही जागा जिंकली नव्हती. मात्र आता एक जागा जिंकून प्रहाने एन्ट्री घेतली आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजप १, शिवसेना १, राष्ट्रवादी २, काँग्रेस १ आणि इतर ९ (यामध्ये प्रहार १) जागा मिळाल्या आहेत.  अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं. अमोल मिटकरी यांनी आज आपल्या मूळ गावी कुटासा येथे आपल्या पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावला.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कालच मंत्री बच्चू कडू यांची तक्रार केली होती. “शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपसोबत जर पालकमंत्री बच्चू कडू आघाडी करत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांना समज द्यावी”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!