Share

पवारांनंतर आता उदयनराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर उदयनराजे हे पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं होतं. आता, उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या काही काळापासून उदयनराजे हे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून राज्यातील विविध नेत्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठीच उदयनराजेंनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची शक्यता आहे.

पवार-उदयनराजे भेट –

गेल्या आठवड्यात शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट पार पडली होती. ‘मराठा समाजातील सगळ्यात जेष्ठ नेते पवार साहेब आणि सध्याच्या सरकारचे सर्वेसर्वा पवार साहेब असल्याने त्यांनी लक्ष घालावे अन्यथा उद्रेक होईल आतापर्यंत शांततेत मोर्चे निघाले पण आता उद्रेक झाला तर काय होईल हे त्यांना देखील कळणार नाही,’ असा टोकाचा इशारा देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता.

तर, ‘मराठा समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गायकवाड समितीने मराठा समाजाला कुणबीप्रमाणे आरक्षण द्यावे असे सांगितले होते. मात्र, अद्यापही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं मात्र सद्या सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासन गंभीरतेने मुद्दा मांडत नाही त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे.’ असं टीकास्त्र त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!