Share

स्वतंत्र भारतात प्रथमच ज्या महिलेला फाशी दिली जाणार आहे तिने जाणून घ्या काय केलाय गुन्हा !

Published On: 

मुंबई : स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधील शबनम या महिलेनं २००८ साली आपल्या प्रियकरासोबत आपल्या नात्यातल्या 7 जणांचा कुऱ्हाडीने खून केला होता. या प्रकरणात शबनमला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

या क्रूरकर्मा महिलेचा राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला आहे. मथुरा जेलमध्ये तिला फाशी होईल. फाशीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली आहे. निर्भया प्रकरणातल्या आरोपांना फाशी देणारा पवन जल्लादचीच या फाशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. फाशीची तारीख मात्र अजून निश्चित झालेली नाही.

दरम्यान,मथुरा कारागृहात दीडशे वर्षांपूर्वी एक महिला फाशी घर बांधले गेले होते. पण स्वातंत्र्यानंतर कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. वरिष्ठ जेल अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय म्हणाले की, फाशीची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही, परंतु आम्ही तयारी सुरू केली आहे. मृत्यूची वॉरंट निघताच शबनमला फाशी देण्यात येईल.बिहारमधील बक्सरमधून फाशीसाठी दोरखंड मागवण्यात आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
शौकत अलीने एकुलती एक मुलगी असलेल्या शबनमला मोठे लाड करून वाढवले. एवढेच नव्हे तर उत्तम शिक्षणही दिले. एमए उत्तीर्ण झाल्यानंतर शबनम शिक्षिका झाली. पण यावेळी गावातल्या आठवी पास तरूण सलीमशी शबनमचे प्रेमसंबंध सुरू झाले. दोघेही इतके प्रेमात बुडले होते की त्यांना घराची किंवा समाजाची काळजी नव्हती. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण शबनमच्या घरच्यांचा यास विरोध होता.

कुटुंबातील लोकच तिच्या प्रेमात आडकाठी ठरत होते यामुळे तिने प्रियकरासोबत मिळून हे दुष्कृत्य केले. अमरोहाच्या हसनपूरमधील बावनखेडी गावात २००८ च्या १४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली होती. इथे शबनमने आपला प्रियकर सलीमसोबत मिळून आपले वडील, शिक्षक शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिणी अंजुम आणि चुलत बहीण राबिया यांची कुऱ्हाडीने कापून हत्या केली होती. भाचा अर्शचा गळा आवळला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!