औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. खबरदारी म्हणून मनपाने तयारी सुरु केली असून शहरात कोविड बाल रुग्णालय उभारणीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि.१७) पालिकेच्या शिक्षक सहकारी पतसंस्थेची मासिक बैठक संपन्न झाली. यात मनपा प्रशालेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्यास पाच हजार रुपयांची मदत पतसंस्थेद्वारे करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब घरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
सोमवारी (दि.१७) बेबी मालोदे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक सहकारी पतसंस्थेची मासिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेत विद्यार्थ्यांना लागण होण्याची शक्यता आहे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मनपा शाळेत शिकणारा विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातील आहे. या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली तर पालकांना मदत म्हणून विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी तातडीने पाच हजारांची मदत मनपा शिक्षक पतसंस्थेच्या वतीने देण्यात यावी हि मागणी मान्य करण्यात आली.
सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने शहानिशा करून विद्यार्थ्यांची शिफारस केल्यास पालकांच्या नावे रुपये पाच हजारचा धनादेश देण्यात येईल. या बैठकीस पतसंस्थेचे उपाध्यक्ष जुबेर शेख, सचिव डॉ. संपत इधाटे, शिक्षणाधिकारी तथा संचालक रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी तथा संचालक संजीव सोनार, संचालक कामिनी सुरंगळीकर, अर्चना जोशी, भारत तीनगोटे यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- तयारी तिसऱ्या लाटेची! जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोविड बाल रुग्णालय होणार सुरु
- दिलासा! आ.श्वेता महालेंनी सुरू केले आधार कोविड सेंटर
- चक्रीवादळाचा तडाका ; मुंबईजवळ समुद्रात ४०० जण अडकले,बचावासाठी नौदलाची जहाजं रवाना
- धोका कायम ! चक्रीवादळ गुजरात दिशेने, मात्र मुंबईसह कोकण किनारपट्टीला नवा इशारा
- मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार – घाटगे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

