Share

औरंगाबादेत जागृत हनुमान संस्थानचा सकारात्मक पुढाकार, कोरोना रुग्णांसाठी उघडले मोफत कोविड सेंटर!

Published On: 

औरंगाबाद : जगभरात कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे. औरंगाबाद शहरात देखील कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. सद्यस्थितीत जरी दिलासा मिळाला असला तरी येत्या काळात रुग्ण वाढू शकतात. या परिस्थितीत शहरवासीयांना मदत व्हावी या उदात्त हेतूने जागृत हनुमान संस्थान व दक्षिण केसरी मुनी मिश्रिलालजी महाराज हॉस्पिटल (डिकेएमएम) संयुक्तपणे मोफत कोविड सेंटर सुरू केले आहे. गुरूवारी (दि.२९) सतीश व्यास यांच्याहस्ते या सेंटरचा शुभारंभ झाला. या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

जागृत हनुमान ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योजक सतीश व्यास यांनी गारखेडा भागात असलेल्या डिकेएमएम संस्थेचे हॉस्पिटल दत्तक घेतले आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेला मदत व्हावी, व गरजूंना मोफत उपचार मिळावा, हा शुद्ध हेतूने कल्पना आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेतला. या रुग्णालयात ६ ऑक्सिजन बेड असून, १ एमडी डॉक्टर, २ डॉक्टर, ६ नर्स व इतर स्टाफ उपलब्ध असणार आहेत.

सद्यस्थितीत कोरोना झाल्यावर रुग्णाला अॅडमिट करणे, हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणे, बाहेरून औषधी नेऊन देणे, अंत्यसंस्कारासाठी परवानगी काढणे, बाहेरगावच्या रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण घेणे यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे या मोफत कोविड सेंटरचा गरजूंना मोठा दिलासा मिळणार आहे. येथे येणार्‍या सर्व रुग्णांची व नागरिकांची सतीश व्यास यांच्यावतीने चहा, नाश्ता, जेवण, दैनंदिन गरजेच्या वस्तू, उपचार मोफत देण्यात येईल. असे आवाहन सतीश व्यास, ताराचंदजी दुगर, दीपक व्यास यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!