Share

पालकाकडून शाळेच्या व्हाट्सअप ग्रुपवर पडला अश्लील फोटो मग काय झाले ते वाचा

Published On: 

औरंगाबाद : सोयगाव येथील केंद्रीय प्राथमिक (मुलींची) शाळा सोयगाव या व्हाट्सप ग्रुपवर अश्लील फोटो व्हायरल केल्याचे गुरुवारी उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे पालकांनी संतप्त होत गटशिक्षण अधिकारी सोयगाव यांना तक्रार देत यास जबाबदार असणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिक्षण विभागातर्फे १० दिवस होऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने कारवाईच्या मागणीसाठी आता पालकांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयासमोर ता.२४ पासून आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे.

सोयगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा वर्ग सातवीच्या मुलींसाठी वॉट्सअप ग्रुप असून या ग्रुपचे पी.ई.पाटील, एस.बी.चौधरी, एस.एल.चौधरी व झेड.सी.पोतरे असे चार सहशिक्षक एडमीन आहेत. कोरोना १९ च्या लॉकडाऊनमध्ये विद्याथ्र्यांना ऑनलाइन अभ्यास करता यावा हा या ग्रुपचा मूळ उद्देश आहे. मात्र शाळा बंद असतांना शिक्षण विभागाकडून व सद्यास्थितीत कोणतेही निर्देश नसतांना हा ग्रुप सुरू होता. विद्यार्थी घरी केलेला अभ्यास वर्ग शिक्षकांना ग्रुपवर टाकत होते.

दरम्यान, गुरुवारी (ता.१०) सोशल मीडियाच्या या व्हॉटसप ग्रुपवर जंगलातांडा येथील एका विद्याथ्र्यांच्या पालकाडुन अभ्यासासह चुकुन एक अश्लील फोटो अपलोड करण्यात आला होता. त्यामुळे हा फोटो ग्रुपमधील अनेक विद्यार्थिनीसह पालकांनी पहिला होता. शाळेच्या ग्रुपवर अश्लील फोटो आल्याने याची सर्वत्र चर्चा होऊन पालकांनी संतप्त होत या प्रकाराची तक्रार गट शिक्षणाधिकारी कार्यालय सोयगाव यांच्याकडे करीत कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी कार्यालयातर्फे पालकांच्या तक्रारीवरून केंद्रप्रमुख मोती जोहरे यांच्या मार्फत चौकशी करण्यात येऊन अहवाल मागवून घेतला आहे. या अहवालात ग्रुपवर व्हायरल झालेला व्हिडीओ विद्याथ्र्यांच्या पालकांकडूनच झाल्याचे स्पष्ट झाल्याचे म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!