मुंबई: कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. परंतु या कोरोनाचा फटका केवळ सामान्य लोकांना नाही, तर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकरांना देखील याचा आर्थिक फटका बसला आहे. चित्रीकरण बंद असल्याने कित्येक कलाकरांना काम नाही त्यामुळे कलाकारांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. यातच आता अभिनेत्री शगुफ्ता अली आर्थिक संकटात सापडली आहे.
शगुफ्ता अली यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, त्या गेली २० वर्षे आजारी आहेत. मात्र त्यावेळी हे अगदी कमी प्रमाणात होतं. त्यामुळे त्यांची तब्येत चांगली होती. मात्र सध्या त्या कॅन्सरच्या थर्ड स्टेजला आहेत. त्यांनी म्हटलं आहे, मी पहिल्यांदा ही गोष्ट मीडियाला सांगत आहे. मी या अवस्थेत आहे, हे माझ्या जवळच्या काही मित्रांव्यतिरिक्त कोणालाच माहिती नाही. त्याना स्तनाचा कॅन्सर झाला आहे आणि त्याची थर्ड स्टेज होती. त्यामुळे त्यांना तात्काळ सर्जरी करावी लागली होती.
त्यांना गेल्या ६ वर्षांपासून त्यांना मधुमेहाचा त्राससुद्धा सुरु आहे. त्यांनी सध्या खुपचं वाईट काळ सुरु असल्याचं म्हटलं आहे. कलर्स टीव्हीवरील ‘बेपानाह’ मध्ये त्या काम करत होत्या, मात्र गेल्या चार वर्षांपासून त्या शोमधून बाहेर होत्या. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शगुफ्ता गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी जवळपास १५ चित्रपट आणि २० मालिकांमध्ये काम केले आहे. आज त्याच शगुफ्ता आर्थिक संकटाचा सामना करत आहेत एवढंच नाही तर त्यात भर म्हणजे त्या आजारी असून त्यांचे संकट अधिक वाढले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एन्काऊंटर पॅटर्नचे समर्थन केल्याने वाद निर्माण का झाला आहे ?
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- नारायण राणे होणार केंद्रीय मंत्री ?, दिल्लीहून आले तातडीचे बोलावणे
- निवड समिती अध्यक्षांच्या हट्टामुळे पृथ्वी शॉ इंग्लंड दौऱ्याला मुकला
- आयपीएल २०२१ मध्ये श्रेयस अय्यर करणार पुनरागमन ; दिल्लीच्या कर्णधारपदावर दिलं उत्तर


