🕒 1 min read
मुंबई : आपल्याला माहित आहे की, कलाकार म्हटलं की ते दररोज आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी काही कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करतात किंवा काहीजण आपल्या अभिनयाचा वापर करून त्यांच्याशी जोडून राहतात. अशातच सर्वांची लाडकी मराठमोठी अभिनेत्री पूजा सावंत एका गोष्टीमुळे सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
प्रत्येकाला कोणताना कोणता व्यक्ती हा आवडत असतो. तर काही मुलींनी आपला भविष्यात होणारा नवरा कसा असावा हे देखील त्यांनी ठरवून ठेवलेलं असतं. असं काहीस आपल्या पुजा सावंतनेही ठरवून ठेवलं असल्याचं कळालं आहे. पूजाने चक्क बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा बॉयफ्रेंड म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
माझा तुझ्यावर खूप मोठा क्रश आहे, असं पूजा म्हणाली. सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे हे सगळं बोलताना ती चक्क लाजत असल्याचं समजतं आहे.
पूजाला सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ या मराठी कार्यक्रमात बोलवण्यात आलं होतं. या कार्यक्रमात एक खेळ असा असतो की, त्यामध्ये आलेल्या कलाकाराला एखाद्या व्यक्तीचा फोटो दाखवला जातो आणि फोटोतील व्यक्ती आपला सहप्रवासी असल्याचं बोलायचं असतं. तर पूजा सावंतला सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो दाखवण्यात आला होता. त्यावेळी ती बोलत होती.
महत्वाच्या बातम्या :
- Karuna munde | एकीकडे धनंजय मुंडेंना टोला तर दुसरीकडे करुणा मुंडेंची घेणार भेट; काय आहे मुख्यमंत्र्यांची नवी खेळी
- Prithviraj Chavan | विरोधकांना मत देणाऱ्यांवर कारवाई करा- पृथ्वीराज चव्हाण
- Karuna munde | “निर्लज्ज लोकांना पापांची फळं मिळतातच”; करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
- Eknath Shinde। मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?; एकनाथ शिंदेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
- Assembly Session 2022 | “धनंजय मुंडेंचा सगळा प्रवास मला माहितीये, त्यामुळे…”; एकनाथ शिंदेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
