🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे या नुकत्याच तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. त्यांच्यावर पुण्यातील एका महिलेने गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्या काही दिवस तुरुंगात होत्या. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुकवर लाईव्ह येत धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केले आहेत. त्यातच आता करुणा मुंडे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमागे नक्की काय कारण आहे, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
आजच एकनाथ शिंदेंनी सभागृहात बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला होता. ” विधानसभेच्या पत्र्यांवर घोषणा द्यायला धनंजय मुंडे पण होते. ते एवढ्या जोरात बोलत होते, की ते किती वर्षांचे शिवसैनिक आहेत, असं वाटत होत. बेंबीच्या देठापासून ओरडून, तुमचा घसा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले, पण आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहिती आहे, त्यावेळी देखील आपल्या देवेंद्रजींनी थोडं प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली, दाखवली ना?”, असं ते म्हणाले. यावेळी शिंदेनी ‘करुणा’ हा शब्द जाणूनबुजून वापरल्याचं लगेच स्पष्ट होतं. कारण असं म्हणल्यानंतर शिंदे मिश्किलपणे हसले देखील. पण आता शिंदेंच्या भेटीला करुणा मुंडे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्या भेटीत नक्की काय चर्चा होणार? कि करुणा मुंडे या शिंदे गटाला समर्थन देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर आरोप
“मला खोट्या केसमध्ये अडकवून तुरुंगात टाकण्यात आलं. ४१ दिवसांनी मी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहे. जेव्हा मी जेलमध्ये गेले तेव्हाच महाविकास आघाडीची सत्ता गेली. ज्यांना सत्तेची मस्ती होती त्यांची मस्ती आता उतरली. माझ्यावर जश्या खोट्या केस केल्या तशाच केस मी त्यांच्यावरही केल्या असत्या. पण मी तसं नाही केलं. कारण लोकांनी मी देवाला मानते. मला कर्मावर विश्वास आहे. त्यामुळे मी देवाला प्रार्थना केली होती कि, माझ्या तपस्येमुळे मागच्या सरकारची सत्ता आली होती. त्यामुळे मी तुरुंगातून बाहेर यायच्या आत जाऊदे आणि तसंच झालं. ज्यांनी खोटी केस केली त्यांना शिक्षा मिळाली. निर्लज्ज लोकांना त्यांच्या पापांची फळं मिळतातच.”, असा अप्रत्यक्ष निशाणा करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर साधला.
महत्वाच्या बातम्या:
- Prithviraj Chavan | विरोधकांना मत देणाऱ्यांवर कारवाई करा- पृथ्वीराज चव्हाण
- Karuna munde | “निर्लज्ज लोकांना पापांची फळं मिळतातच”; करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
- Eknath Shinde। मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?; एकनाथ शिंदेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
- Assembly Session 2022 | “धनंजय मुंडेंचा सगळा प्रवास मला माहितीये, त्यामुळे…”; एकनाथ शिंदेंचा टोला
- Devendra Fadanvis | मानधन वेळेत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करणार – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
