अहमदाबाद : इंग्लंडचा पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय संघाने २०५ धावांवरचं आटोपला यानंतर, भारतीय संघ फलंदाजीला उतरला. मात्र, पहिल्या दिवसाखेर शुबमन गिल याची विकेट गमावून भारताला २४ धावा करता आल्या. आज सकाळी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी सुरुवात केली. २३ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पुजारा बाद झाला. यानंतर लगेचच, कर्णधार विराट कोहली याला खातं न उघडताच शून्य धावांवर माघारी फिरावं लागलं.
तर, रोहित शर्माचं अर्धशतक अवघ्या एक धावेने हुकलं. १४४ चेंडूंमध्ये ४९ धाव बनवून रोहित शर्मा बाद झाला. यानंतर, अजिंक्य रहाणे व आर अश्विन फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. मात्र, रिषभ पंत याने भारतीय संघासाठी महत्वपूर्ण शतक बनवत भारताचा डाव सावरला आहे. वॉशींग्टन सुंदर आणि रिषभ पंत यांच्या भागिदारीने भारताने इंग्लंडवर आघाडी मिळवली आहे.रिषभ पंत याने दमदार षटकार ठोकून शतक केलं. यानंतर, उपस्थितांनी त्याला उभं राहून दाद देखील दिली. हे त्याच तिसरं कसोटी शतक ठरलं आहे.
Aap hi ko follow kar raha hoon, Viru-Paaji, Learning from the Best! https://t.co/VUxMz1Be9x
— Rishabh Pant (@RishabhPant17) March 5, 2021
पंतच्या या शानदार खेळी नंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने इंस्टग्रामवर एक पोस्ट शेअर करून पंतचे कौतुक केले आहे. ट्विटरवर एक मिम्स शेअर करून अरी दादा ! मजौ आगौ म्हणत पंतच कौतुक केलं आहे. सेहवागच्या ट्विट ला रिट्विट करत म्हणाला, जे काही करतोय ते तुम्हाला पाहूनच करतोय असे ट्विट करत पंतने आभार मानले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- आखेर ‘त्या’ महिलांच्या आभूतपुर्व लढ्याला यश; दारुबंदीचा ठराव मंजूर
- टीसीच्या नोकरीचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणाचा तिघांना १६ लाखांचा गंडा
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू


