अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली. अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी टेस्ट मॅच दोन दिवसांच्या आत संपली. या निकालानंतर अहमदाबादच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला टीकाकारांना चोख उत्तर देताना म्हटले की, न्यूझीलंडमध्ये आम्ही तीन दिवसांत हरलो तेव्हा कुणी बोलले नाही. तेव्हा आमच्या फलंदाजांच्या तंत्रावर पराभवाचे खापर फोडले. वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीला कोणी दोषी ठरवले नाही. काही व्यक्ती चेंडू व खेळपट्टीवर फोकस का करतात हेच समजत नाही. कोणताही संघ जिंकण्यासाठी मैदानात उतरतो. तो विजय मग कितीही दिवसांमध्ये मिळो.
दोन्ही संघांतील फलंदाजांना तिसऱ्या कसोटीत निराशेचा सामना करावा लागलाय. फलंदाजांनी या खेळपट्टीवर कौशल्य दाखवायला हवे होते. प्रत्यक्षात ते झाले नाही. त्यामुळे खेळपट्टीला दोष देणे चुकीचे आहे. आता आमचा फोकस खेळपट्टीवर नाहीए. स्वतःला मजबूत करण्याकडे आहे, असे स्पष्ट मत विराट कोहली याने यावेळी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टरची महिलेकडे शरीरसुखाची मागणी
- घोडयावरून येण्यास तयार असलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्याचे पुन्हा एक पत्र, म्हणाला..
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! एकाच दिवसात वाढले ३७१ रुग्ण, ८ जणांचा मृत्यू
- महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी औरंगाबादच्या प्रियंका गारखेडेची निवड
- ‘लाचारी करून मिळालेल्या सत्तेने लाटही येत नाही आणि ती टिकत ही नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

