🕒 1 min read
अहमदनगर:- यंदा कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यांनतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेसाठी अनेक आजी माजी मंत्री आणि आमदारांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या असून जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अहमदनगर जिल्हा बँकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. निवडणुकीसाठी सध्या अर्ज वाटपाला सुरुवात झाली असून मंगळवारी पहिल्या दिवशी 23 जणांनी 153 अर्ज घेतले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन नगर जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेस आणि शिवसेनेने यासंबंधी कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. ह्या निवडणुकीसाठी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे, मंत्री शंकरराव गडाख, अशा दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपवाले भविष्यात देशाचा हिंदुस्थान ऐवजी कमलास्थान असा उल्लेख करतील; राष्ट्रवादीची टीका
- लातूर मनपाकडून व्याजावर 100 टक्के सुट
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
- शहरांची नावं बदलता बदलता भाजपच्या मुख्यमंत्र्यांने चक्क फळाचे देखील नाव बदलले
- मोहम्मद सिराजचे धमाकेदार प्रदर्शन अन् ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचे ‘थोबाड’ कायमचे बंद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
