🕒 1 min read
नांदेड : इंधनाच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळत नाही. विमा कंपनी दिवसाढवळ्या सरकारच्या तिजोरीवर- शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारत आहे. शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या समस्यावरील लक्ष इतरत्र वळवण्यासाठीच केंद्र व राज्य सरकार आर्यन खान, समीर वानखेडे हे प्रकरण प्रसारमाध्यमांना हाताशी धरून चालवले जात आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.
अर्धापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ साठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. यानिमित्त ते नांदेड जिल्ह्यातील पार्डी (ता. अर्धापूर) येथील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाआघाडीसोबत राहण्याचा फेरविचार राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात येईल. विमा कंपनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही. पीक कापणी पद्धत सदोष आहे. त्यामुळे उंबरठा उत्पन्न चुकीचे येते. या कंपनीत खूप मोठा भ्रष्टाचार आहे. विमा कंपनीत खूप मोठे घोटाळा असून यात राज्यातील उच्चपदस्थ आहेत, असा आरोपीही शेट्टी यांनी केला.
आम्ही वेळोवेळी आवाज उठवला आहे. विमा कंपनीचा गैरकारभार लवकरच बाहेर काढण्यात येईल. जातिवादी भाजपचे सरकार येऊ नये म्हणून आम्ही महाआघाडीसोबत गेलो. केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या समस्यांना बगल देत आहे. या दोन्ही सरकारवर दबाव आणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार टप्प्यांत एफआरपी देणे चुकीचे आहे. कारखानदार ऊस व साखरेचे चोरी करतात, असा आरोप शेट्टी यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रात पाव किलो ड्रग्ज शोधणाऱ्यांनी गुजरातमधल्या…’, एनसीबीवर राऊतांचा हल्लाबोल
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून नवाब मलिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप!
- भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सगळे कपडे स्वच्छ होतात-संजय राऊत
- एसटी कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? भाजपचा सवाल
- ‘होय, आम्ही कामगारांच्या पगाराची जबाबदारी स्वीकारतो, तुम्ही राजीनामा देणार का?’


