कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 च्या निकषावरुन मदत देण्यात यावी, अशी मागणी करत राजू शेट्टी हजारो शेतकऱ्यांसह जल समाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. सर्व शेतकऱ्यांसह राजू शेट्टी यांनी आंदोलन करत नृसिंहवाडीमध्ये पोहोचले आहेत. पोलिसांनी सर्व नदीकाठांवर आणि पुलांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, ‘ज्यावेळी जीव धोक्यात घालायचा असेल तेव्हा पहिला नंबर माझा असेल. त्याआधी कोणीही गडबड करू नये. सध्या पोलीस प्रशासनाने आम्हाला नृसिंहवाडी येथील एसटी स्टॅण्डवर एकत्र येण्यास परवानगी दिली आहे. शासनाचा आम्हाला प्रस्ताव येणार आहे. तो पाहिल्यानंतर आम्ही पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेऊ. इचलकरंजी प्रांत अधिकारी शासनाचा प्रस्ताव घेऊन येणार आहेत,’ अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.
पोलीस बंदोबस्त झुगारत कार्यकर्त्याची पाण्यात उडी
दरम्यान, आंदोलक शेतकरी हे अधिक आक्रमक झाले आहेत. नदीच्या बाजूला असणाऱ्या ऊसामधून एका कार्यकर्त्याने पोलिसांची नजर चुकवत पाण्यात उडी घेतली आहे. राजू शेट्टी यांनी ज्या ठिकाणी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता त्या ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे. पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम नृसिंहवाडी येथे आहे. या नदीवरील पूलावरही पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे. पोलिसांची नजर चुकवत आणि त्यांनी केलेला बंदोबस्त जुगारुन कार्यकर्त्याने पाण्यात उडी घेतली. यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- बंदुकीसह करुणा शर्मा परळी पोलिसांच्या ताब्यात, धनंजय मुंडे समर्थक शेकडो महिला ठाण्याबाहेर जमा
- ‘इन्फोसिसचे देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान’; ‘त्या’ वादग्रस्त स्टोरीनंतर संघाचे स्पष्टीकरण
- शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा
- संघासारख्या देशभक्तांमुळे भारत हिंदुराष्ट्र होतोय म्हणून ते निराश; राणेंची अख्तर यांच्यावर टीका
- ‘आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही’; मुख्यमंत्री ठाकरेंनी केलं महत्वाचं आवाहन


