नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन आता शेतकऱ्यांना अनेक स्तरांमधून पाठिंबा मिळताना दिसत आहे. नुकतच कुस्तीपटूंकडून देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे. तर आता शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या यादीमध्ये पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त माजी खेळाडूंचाही समावेश झाला आहे. या माजी खेळाडूंनी सरकारला पदकं परत करण्याची घोषणा केली होती.
केंद्र सरकारच्या या कृषी विधेयकाचा निषेध म्हणून खेळाडूंनी आपल्याला देण्यात आलेले पुरस्कार परत करण्यासाठी तसेच आंदोलन करण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघाले. मात्र या सर्व खेळाडूंची पोलिसांनी अडवणूक केली. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुरस्कार वापसी करणारे खेळाडू हे पंजाब आणि इतर राज्यातील आहेत. या एकूण 30 जणांमध्ये आजी आणि माजी खेळाडूंचा समावेश आहे.
पैलवान करतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “30 खेळाडू आंदोनल करत राष्ट्रपतींना पुरस्कार परत करण्यासाठी जात आहेत. मात्र पंजाब आणि इतर खेळाडूंना पण पुरस्कार वापसी करायची आहे”. बॉक्सर विजेंदर सिंह याने देखील केंद्र सरकारने विधेयक मागे घेतले नाहीत, तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे.
Delhi Police stop sportspersons who were marching towards Rashtrapati Bhavan to return their awards to the President in protest against the new farm laws. Wrestler Kartar Singh says, "30 sportspersons from Punjab and some others want to return their award". pic.twitter.com/tnzMLKs35J
— ANI (@ANI) December 7, 2020
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीने केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याला पाठींबा द्यायला हवा होता – रामदास आठवले
- शेतकरी आंदोलन: राजू शेट्टी वाहत्या गंगेत हात धुवून घेतायत?
- टाटा मोटर्सच्या गाड्यांवर मिळणार चक्क ‘एवढी’ सूट, हॅरिअर, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर !
- पोलीस आणि सरकारवर सँडल गायब केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल
- शेतकरी आंदोलन : उद्याच्या भारत बंद दरम्यान काय सुरू, काय राहणार बंद ?

