Share

शेतकरी आंदोलन: राजू शेट्टी वाहत्या गंगेत हात धुवून घेतायत?

Published On: 

पुणे:- केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. केंद्र सरकारने जूनमध्ये कृषी कायद्यासंदर्भात तीन अध्यादेश काढले होते. तेव्हा त्याला राजू शेट्टी यांनी तत्वत: पाठिंबा दिला होता. पण आता दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर नवा आरोप केला आहे. अदानी आणि अंबानी या उद्योगपतींना लॉकडाऊन काळातील तोटा भरून काढता यावा म्हणून शेतकऱ्यांच्या माथी कृषी विधेयके मारण्यात आली आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. आधी केंद्र सरकारच्या अध्यादेशातील अनेक मुद्द्यांना पाठिंबा दिल्यानंतर आता कृषी कायदाच मागे घेण्याची भूमिका शेट्टी यांनी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या १२ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान, सरकारने मोठेपणा दाखवून तिन्ही विधेयकं मागे घ्यावीत. शेतकरी पहिल्यांदाच काहीतरी मागतोय. अन्यथा आणीबाणीच्या काळात जसा उद्रेक झाला तसा उद्रेक होईल, असा इशारा शेट्टी यांनी आज दिला आहे.

यापूवी केंद्र सरकारने जूनमध्ये कृषी कायद्यासंदर्भात तीन अध्यादेश काढले होते. तेव्हा त्याला राजू शेट्टी यांनी तत्वत: पाठिंबा दिला होता. शेट्टी यांचा या अध्यादेशाला सरकट पाठिंबा नव्हता. त्यातील काही मुद्द्यांना त्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु, याच अध्यादेशाचं रुपांतर कायद्यात झाल्यानंतर शेट्टी यांनी हा संपूर्ण कायदाच रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शेट्टी यांनी शेतकरी आंदोलनाची हवा पाहून भूमिका बदलली असून राजकीय फायद्यासाठी त्यांनी हा विरोध केल्याचं जाणकारांचं मत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!