Share

पोलीस आणि सरकारवर सँडल गायब केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ८ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर एका महिला शेतकरी नेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या महिला शेतकऱ्याचे गीता भाटी असे नाव असून आंदोलनादरम्यान सँडल गायब झाल्यानंतर तिने सरकार आणि पोलिसांवर आरोप केले. ह्याच आरोपांना घेऊन सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाला आहे.

गीता भाटीने सरकार आणि पोलिसांवर आरोप करताना म्हटलं आहे, ‘सरकार आणि पोलिसांनी दोघांनी मिळून माझा सँडल गायब केला आहे. त्यांनी तो लवकरात लवकर मला परत करावा’. गीता भाटीच्या हास्यास्पद आरोपानंतर ट्विटरवरील युझर्सने #’गीता भाटी का सँडल वापस करो’ नावाने ट्रेंड केला आहे.

https://twitter.com/RohitDwi143/status/1335901776692711424?s=20

https://twitter.com/JUSTAUS70109239/status/1335901610086596608?s=20

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!