उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता उस्मानाबाद जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीकरीता नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यापुढे लग्नास ५० जणांना तर अंत्यविधीस २० जणांनाच परवानगी राहील. तसेच लग्नसोहळ्यापूर्वी पोलिस प्रशासन व स्थानिक स्वराज संस्थेची परवानगी बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलेत.
तसेच एसओपीचे पालन न करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाईचेही आदेश देण्यात आले आहेत. डीसीएचसी, सीसीसी इमारतींची तपासणी करून त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक साहित्य, औषध सामग्री व्यवस्थित तयार ठेवावी, खाजगी डॉक्टारांनी संशयित कोरोना रुग्णांची माहिती तत्काळ शासकीय आरोग्य यंत्रणेला द्यावी, कोविड बाधीत रुग्णांच्या संपर्कातील किमान २० ते ३० हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवावे, ज्या भागात रुग्णसंख्या वाढतेय तेथे प्रतिबंधित क्षेत्र तयार करावेत.
लग्न समारंभास ५० व अंत्यविधीस २० लाेकांनाच परवानगी द्यावी, सार्वजनिक ठिकाणी मास्क व सुरक्षित अंतराचे पालन होत आहे का याची तपासणी करावी, हॉटेल, बार, कॅफेत ५० टक्केच क्षमतेने ग्राहकांना प्रवेश द्यावा, ही सर्व ठिकाणे सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंतच सुरू राहतील. अशा अनेक सूचना देऊन मिरवणुका,यात्रा, स्पर्धा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे कोरोनाला आळा बसेल, अशी प्रशासनाला आशा आहे. नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
- अवकाळीचा फटका, उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाखांची मदत
- वाह रे मनपा! २६ लाख औरंगाबादकरांवर वचक ठेवण्यासाठी फक्त ५० कर्मचारी
- पॉझिटिव्ह विचाराने नोकरीसाठी गेले अन् कोरोना पॉझिटिव्हच निघाले!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

