औरंगाबाद : घरासमोर उभ्या असलेल्या तिघांच्या दुचाकी चोरांनी मध्यरात्री लांबवल्याचे प्रकार आठवडाभरात घडले. पहिली घटना १ जून रोजी हडको, सुदर्शननगरात घडली. एका महिलेची दुचाकी घरासमोरील अंगणात उभी होती. मध्यरात्री चोराने महिलेची दुचाकी (एमएच-२०-सीव्ही-०७५०) लांबवली.
त्यानंतर दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या. ६ जून रोजी विलास जवाहरलाल फतपुरे (३०, रा. गल्ली क्र. १२, आंबेडकरनगर, सिडको) हे वाळुज येथील श्रीराम कॉलनीत गेले होते. रात्री अकराच्या साडेदहाच्या सुमारास त्यांनी घरासमोर दुचाकी (एमएच-२०-सीएन-९९९४) उभी केली होती. चोराने त्यांची दुचाकी हँडल लॉक तोडून लांबवली.
तसेच संतोष विठ्ठल रिठे (३६, रा. कामगार कॉलनी, चिकलठाणा) हे वाहन चालक आहेत. त्यांनी रात्री अकराच्या सुमारास घरासमोर दुचाकी उभी केली होती. त्यांची देखील दुचाकी चोराने हँडल लॉक तोडून लंपास केली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
- “पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

