औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील व सोलापुर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जय श्रीराम इंडियन ऑईल पेट्रोल पंपाचे मॅनेजर अशोक गोपीनाथ काकडे यांनी शनिवार रविवार अश्या दोने दिवसांचे पेट्रोल, डिझेल यांच्या विक्री करून जमा झालेली रोक रक्कम ५ लाख ३७ हजार रुपये स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा वेरुळ येथे भरण्यासाठी मोटार सायकवर बसून वेरुळ गावाकडे जात असतांना त्यांच्या मोटार सायकलला वेरुळ उड्डाण पुलालगत कोणीतरी मागुन धक्का देवुन त्यांना खाली पाडुन लोखंडी राॅडने मारुन त्यांनी जवळील पैशाची बँग हिसकावून घेवुन मोटार सायकलने पळुन गेले असल्याची तक्रार पंप मालक विजय आसाराम बोडखे यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात दिली.
खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहञे यांनी गुन्ह्याचा तपास करत असताना खबरीकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे माहिती मिळाली की, पेट्रोल पंपावर पुर्वी काम करणारा व त्याला कामावरुन कमी केलेला प्रकाश कल्याण चुंगडे रा. खापरखेडा ता.कन्नड याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. पोलिसीखाक्या दाखवून त्याने हा गुन्हा चार साथीदारांच्या मदतीने केल्या असल्याची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांनी प्रकाश कल्याण चुंगडे याकडुन मिळेलेल्या माहीती वरून
महेंद्र रामदास साळुके वय २१ वर्ष रा.मनुर ता.वैजापुर, नितीन घाशीराम राजपुत वय २१ वर्ष रा.खापरखेडा ता.कन्नड, अर्जुन मिठु ताटु रा.रुपवाडी पोस्ट सासेगांव ता.कन्नड यांना ताब्यात घेवून गुन्ह्याबाबत विचारपुस केली, त्यानंतर संशयितांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीलाकडुन रोख ३ लाख ११ हजार ६७० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेल दोन मोटार सायकल, आरोपीचे ०३ मोबाईल असा एकुण ३ लाख ८६ हजार ६७० रुपयेचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे .
आत्तापर्यंत चार आरोपी अटक करण्यात आलेले असुन २४ तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. पंप मालक यांच्या फिर्याद वरुन पोलीस स्टेशन खुलताबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे हे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार ‘स्मार्ट’; मुंबईसह प्रमुख महानगरांत बसविले जाणार स्मार्ट मीटर
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- पुण्यातील भिडे पुलात जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक


