औरंगाबाद : चोरट्यांनी पळवलेल्या तब्बल दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठन एमआयडीसी वाळूज पोलिसांनी १५ दिवसांत तपास करत शोधुन काढले आहे. या वेळी चोर पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
अश्विनी काकडे या महिलेने २१ जानेवारी २०२१ रोजी मैत्रिणीसमवेत मोहटादेवी मंदीराकडून अयोध्यानगरकडे एक्टीव्हा गाडी वर बसून जात होती. तेव्हा एका किराणा स्टोअर्सच्या जवळ वळण घेण्यासाठी गाडीचा वेग कमी केला असता, अचानक पाठीमागुन दोन सडपातळ अनोळखी अंदाजे ३० वयोगटातील काळ्या रंगाच्या पल्सर 220 मोटार सायकलवरुन आले. त्यापैकी मागे बसलेल्या चोराने त्यांच्या गळ्यातील 45 हजारांचे किंमतीचे सोन्याचे मिनीगंठण हिसकावले.
याप्रकरणी रामदास बनकर, अंकुश वजीरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडूनया महिलेचे गंठन व इतर दागिने देखील पकडले आहे. तसेच चोरीचा माल विकत घेणारा आरोपी काकासाहेब मंगे यास देखील अटक केले आहे. अशाप्रकारे वाळूज परिसरातील मंगळसूत्र चोर पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, पो. उप. नि. राजेंद्र बांगर, सफी खव्युमखों पठाण, प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, जालींदर रंधे, विनोद परदेशी, दीपक कोलमी, हरिकराम वाघ, बंडू गोरे, दिपक मतलबे यांनी तपास केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठवाड्यासाठी खुशखबर या दोन नवीन रेल्वे गाड्या सुरु होणार
- कोरानाच्या काळात पोलिसांची काळजी घेण्यात सरकार अपयशी
- ‘न्याय मागण्यासाठी गेलो तर पोलिसांनी कुत्र्यासारखे हाकलून लावले’
- विद्यार्थी सुविधा केंद्राची परीक्षा विभागात स्थापना
- डाळी शंभरीत गेल्याने महिलांचे आर्थिक गणित कोल


