Share

दहशतवादी हल्ला परतविण्याचे विभागीय आयुक्त कार्यालयात पोलिसांचे प्रात्याक्षीक

Published On: 

औरंंगाबाद : दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचा कसा सामना करायचा याचे प्रात्याक्षिक रविवारी (दि.३०) सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आले असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिली. पोलिसांचे हे प्रात्याक्षिक पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिस दल किती सक्षम आहे याचे प्रात्याक्षिक यावेळी करण्यात आले.

रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षात फोन आला की, विभागीय आयुक्त कार्यालयात दहशतवादी शिरले असून त्यांनी चार अधिका-यांना आपल्या ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली.

त्यानंतर सिटीचौक, बेगमपुरा, हर्सुल, जिन्सी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांसह गुन्हेशाखा आणि क्युआरटी पथकाची वाहने सायरन वाजवत विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे आजू-बाजूच्या नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालयात काय झाले असा प्रश्न पडला होता, परंतु नंतर हे पोलिसांचे मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!