औरंंगाबाद : जाधव मंडीत भाजी पाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मोबाइल चोरणाऱ्या पंडित सखाराम धनवटे (वय ४०, रा.तिसगाव) याला सिडको पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या पंडित धनवटे याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहारकर यांनी गुरुवारी (दि.२७) दिले.
शहानूरवाडी येथील गुरुपलसिध्द अपार्टमेन्ट मध्ये राहणारे संभाजी पंडीतराव जोगदंड (वय ३६) हे बुधवारी सकाळी पत्नीसह भाजीपाला खरेदी करण्यासाठी जाधव मंडी येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाइल चोरट्याने लंपास केला. भाजी पाला खरेदी केल्यानंतर ही बाब जोगदंड यांच्या लक्षात आली.
त्यांनी एका भाजीपाला विक्रेत्याला मोबाइल बाबत चौकशी केली असता, एका मोबाइल चोरट्याला लोकांनी पकडून चांगलाच चोप दिला असून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे सांगितले. जोगदंड व त्यांची पत्नी पोलिसांकडे गेले असता जोगदंड यांच्या पत्नीला चोरट्याला ओळखले. प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोठ्या दु:खातून मोठं बळ मिळतं…’ रिया चक्रवर्तीच्या पोस्टवर अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया
- ट्विटरला देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल – केंद्र सरकार
- “राज्यसरकार व प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या लपवत आहे, याचा भांडाफोड १ जूनला करणार”, आ. निलंगेकरांचा इशारा
- मोदींना अजून कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधीचा टोला
- ‘मिर्झापूर’ मधील अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट?; ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

