Share

अजिंठा घाटातील ‘ही’ परिस्थिती पाहून राज्यमंत्री सत्तार चांगलेच संतापले..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी ( दि. २०) रोजी अजिंठा घाटात सुरू असलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्ग रस्ता कामाची पाहणी करून आढावा घेतला. दरम्यान येथील सततची होणारी वाहतूक कोंडी व रस्त्याचे होत असलेले अरुंद काम पाहून राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

महामार्गाच्या नियमानुसार व ठरलेल्या अधिकृत हद्दीपर्यंत रस्त्याचे काम करावे जेणे करून रस्ता अरुंद न होता रस्त्याची रुंदी वाढेल, रस्त्याच्या एक बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम करावे, या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पाहता घाटातील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. घाटातील या कामामुळे याठिकाणी सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते ही बाब सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांना सत्तार यांनी चांगलेच खडसावले.

तसेच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. महामार्ग प्राधिकरण मंडळ आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी समनव्ययाने अजिंठा घाटात सोयीस्कर रस्ता कसा होईल यासाठी प्रयत्न करणे तसेच काम करीत असतांना वाहतुकीची कोंडी होणार नाही. यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता डी. एन. थोरात, कनिष्ट अभियंता सागर कळम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा कळम आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!