Share

गांधीजींची हत्या करणाऱ्याला हिरो बनवले जात असेल, तर त्याचा आम्ही निषेध करु- नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नव्या वादाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वाद निर्माण झाला असून या भूमिकेवरून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान, गांधीजींची हत्या करणाऱ्याला हिरो बनवले जात असेल, तर त्याचा आम्ही निषेध करु, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नाना पटोले म्हणाले की,’महात्मा गांधी हे आपल्या देशाची ओळख असून त्यांची हत्या करणाऱ्याला जर हिरो बनवले जात असेल तर पुढील पिढीला काय संदेश देणार? चित्रपट रिलीज झाला तर आम्ही त्याचा निषेध करु, तीव्र विरोध करु’, असा इशारा यावेळी पटोले यांनी दिला. तसेच पुढे शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेविषयी विचारण्यात आले असता पटोले म्हणाले की,’शरद पवार काय बोलले हा माझा विषय नाही. परंतु, गांधीजींची हत्या करण्याला हिरो बनवले जात असेल तर त्याचा आम्ही निषेध करु’, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, याविषयी बोलत असतांना गांधी सिनेमा सगळ्या जगात गाजला. त्या सिनेमात सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका होती. नथुराम गोडसेची भूमिका केली तो कलाकार होता. कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही. त्यामुळे अमोल कोल्हेंनी जी भूमिका केली ती कलावंत म्हणून केली. त्यांनी कलावंत म्हणून भूमिका केली म्हणजे त्यांची गांधींविरोधात भूमिका आहे असा त्याचा अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!