अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नवरात्रानिमित्त घरोघरी महिला व पुरुषांनी नऊ दिवसांचे उपवास सुरू केले आहेत. साबुदाणा, शेंगदाणे, भगर, राजगिरा, असा माल खरेदी केला. मात्र, त्यातील दळलेली भगर उपवास करणाऱ्या भाविकांच्या जिवावर उठली.
भगरीतून विषबाधा झाल्याने, तालुक्यातील विविध गावांतील अनेकांना जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. हा प्रकार समजताच स्थानिक आमदार व राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित गावांत धाव घेतली. ग्रामस्थांची चर्चा करून, उपचाराबाबत सूचना केल्या आहेत.
राहुरी तालुक्यातील मुसळवाडी, देवळाली प्रवरा, खळी, गंगापूर, शेटेवाडी, चिंचविहिरे, कोल्हार खुर्द, म्हैसगाव, पिंपळगाव फुणगी, गुहा येथील काही किरकोळ दुकानदारांनी राहुरी फॅक्टरी वरील दुकानदाराकडून भगर नेली होती.
भगर खाल्ल्याने सुमारे १०० जणांना विषबाधा झाली आहे. एवढी दुर्घटना घडूनही त्या आडमुठ्या किराणा दुकानदाराने पुन्हा खुलेआम त्याच भगरीची विक्री सुरू ठेवली आहे. त्यामुळे या दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.
तालुक्यात अनेकांना दळलेल्या भगरीतून विषबाधा झाल्याने या घडलेल्या घटनेची परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. हा प्रकार समजताच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित गावांत धाव घेतली, व नागरिकांना मदत केली आहे. म्हैसगाव येथे सर्वाधिक ५८ जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. म्हैसगाव येथे काही कुटुंबांतील दोन-तीन महिलांना विषबाधा झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- ६ महिन्याने मुख्यमंत्री घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय?
- नगरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीमधील वाद शिगेला; काँग्रेसचे किरण काळे म्हणाले, संग्राम जगताप गुंड!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

