Share

६ महिन्याने मुख्यमंत्री घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय?

Published On: 

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एक दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री आज परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या नुकसानीची पाहणी करतील. तर उद्या त्यांचा मराठवाडा दौरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मदत जाहीर करणार का याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या दौऱ्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते, असं असेल तर महाराष्ट्रसाठी दुर्दैव दुसरं काय नाही अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले पडळकर ?
प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं, मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारने केली पण राज्य सरकारने काय केले हे सांगावे, अतिवृष्टी झाली केंद्र मदत करेल पण राज्याने केंद्राकडे किती नुकसान झालं याचं आढावा तरी पाठवला पाहिजे, तहसिलदार पोहचत नाही, प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत नाही, राज्य सरकारने नुकसानीचा आढावा तरी घ्यायला हवा, केंद्र सरकारने प्रत्येक वेळेस मदत केली, कोरोना काळातही मदत केली परंतु राज्य सरकारने १ योजना दाखवावी.

मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते, असं असेल तर महाराष्ट्रसाठी दुर्दैव दुसरं काय नाही, शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही अपेक्षा धरली नाही, निर्णय घेण्याची क्षमता नाही, कोणतीही अंमलबजावणी नाही, प्रत्येक अडचणीच्या काळात विरोधी पक्षनेते गावागावात पोहचले आहेत, कोरोना, चक्रीवादळ, विदर्भ पूर प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस लोकांच्या मदतीसाठी पोहचले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!