Share

उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !

Published On: 

मुंबई : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत, तसेच ते उद्या सोलापूरच्या दौऱ्याला देखील जाणार आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.

भाजपचे खासदार व ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देखील यापार्श्वभूमीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे राज्यातले सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. कोरोनामुळे एवढ्या लोकांचा बळी जात असताना आणि राज्यात पुराचा कहर सुरु असताना मुख्यमंत्री घरात बसून होते. आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, आता वेळ उलटून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, असा प्रहार नारायण राणे यांनी केला आहे.

विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं दौऱ्याने उत्तर !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला कृतीतून उत्तर दिलं आहे. उद्या (सोमवारी) ते सोलापूर जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करतील. सोमवारी सकाळी ते मुंबईहुन सोलापूरला ते विमानाने पोहचतील. तेथून सकाळी साडेनऊ वाजता अक्कलकोट तालुक्यातील गावांचा मोटारीने प्रवास करून पाहणी करतील. यानंतर दुपारी तीननंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ते मुंबईला परततील.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!