🕒 1 min read
नवी दिल्ली : २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या विस्तारत एकूण १३ मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली.ज्यामध्ये 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर प्रमोशन देण्यात आले आहे, तर 9 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांमध्ये 4 माजी अधिकारी आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही उपस्थित होते.
हे आहेत चार राज्यमंत्री ज्यांची आता कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
कॅबिनेट मंत्री
1. धर्मेंद्र प्रधान
2. पियुष गोयल
3. निर्मला सीतारमन
4. मुख्तार अब्बास नक्वी
टीम मोदीमध्ये ९ नवे चेहरे समाविष्ट झाले आहेत. यात 4 माजी अधिकारी आहेत. 2019 च्या दृष्टीने यातील सर्वजण महत्त्वाचे मानले जात आहेत.
राज्यमंत्री
1. अश्विनीकुमार चौबे : पहिल्यांदाच खासदार, भागलपूर येथून आमदार आणि बिहारचे आरोग्यमंत्री होते.
2. वीरेंद्र कुमार- लोकसभा खासदार, जे.पी. मूव्हमेंटशी निगडीत, टिकमगढ, मध्यप्रदेशमधून ६ वेळा खासदार
3. अनंत कुमार हेगडे- कर्नाटक लोकसभा खासदार
4. राजकुमार सिंग (आर. के. सिंग)- आरा बिहार खासदार, माजी गृहसचिव
5. शिवप्रताप शुक्ला- राज्यमंत्री होण्याची शक्यता, गोरखपूर, उत्तर प्रदेश
6. हरदीपसिंग पुरी- माजी आयएफएस अधिकारी, अलिकडेच भाजपत प्रवेश
7. सत्यपाल सिंग- मुंबई पोलिस माजी आयुक्त, बागपत येथून पहिल्यांदाच खासदार
8. अल्फोन्ज कन्ननाथम – केरळ, माजी आयएएस अधिकारी
9. गजेंद्रसिंग शेखावत- जोधपूर, राजस्थान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

