अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला होता. नगर जिल्ह्यातूनही काही माजी आमदार राष्ट्रवादीत जातील, अशी चर्चा होती. त्यातही माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नाव घेतले जात होते.
त्यातच माजी मंत्री सुरेश धस यांनी नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना, कर्डिले हे सध्या आमच्या कमळात आहेत. पुढे सुद्धा कमळातच राहतील. सध्या ते बिलकुल बदल करण्याच्या मूडमध्ये नाहीत, असे वक्तव्य केले. तसेच भाजप सोडून जाण्यास आमच्यापैकी कोणीच तयार नाही, असे सांगतानाच आजी- माजी आमदारांबाबत सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
आ.सुरेश धस पुढे म्हणाले की, आमदार बबनराव पाचपुते व माजी मंत्री कर्डिले हे दोन्ही दिग्गज माणसे आहेत. ते मला म्हणाले ‘आमचे नेते’. परंतु मी यांचा नेता कसा होऊ शकतो? माझी यांच्या पायाच्या जवळ उभे राहण्याची सुद्धा योग्यता नाही. कारण पाचपुते हे नऊ वेळा निवडणूक लढले व सात वेळा जिंकले.
विशेष म्हणजे त्यांची सात ही वेळा वेगवेगळी चिन्हे होती. राज्यात सलग अनेक जण निवडून आले. परंतु एवढ्या वेगवेगळ्या चिन्हावर निवडून येणारा महाराष्ट्रात कोणताही आमदार नसेल, ते एकमेव पाचपुते आहेत. त्यामुळे मी त्यांचा नेता कसा होईल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताच श्रोत्यांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.
कर्डिले हे आमचे आयकॉन आहेत. आता राजकारणात काही गोष्टी मागेपुढे होत असतात. पहिल्यांदा त्यांच्या पदरी अपयश पडले आहे. ते सुद्धा सहा वेळा निवडणूक लढले, आणि पाच वेळा विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांची सुद्धा चिन्हे वेगळी राहिली आहेत. ते आता आमच्या कमळात आहेत, पुढे सुद्धा ते कमळातच राहतील. ते बिलकुल बदल करण्याच्या मूडमध्ये नाहीत, आणि आमच्यापैकी कोणीच नाही. त्यामुळे आता कोणीही पक्ष सोडण्याच्या मुडमधे नाही, असे आ.धस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- चित्रपटश्रुष्टीत ठसा उमटवणाऱ्या मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचा आज जन्मदिवस!
- महाभकास आघाडीची मदत तर सोडा पंचनामे सुद्धा झाले नाहीत !
- सत्ता स्थापनेनंतर प्रथमच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा रंगणार सामना
- जीव गेला तरी बेहत्तर, पण माफी मागणार नाही – मुनव्वर राणा
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात होणार कोरोनाची चाचणी मोफत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

