Share

आजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील – नरेंद्र मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतासाठी आता उत्तम वेळ आली आहे. आजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील. संबलपूर हे मोठं एज्युकेशन हब म्हणून उदयास येत आहे. संबलपूरच्या लोकललाही व्होकल बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. जास्तीतजास्त स्टार्टअप्स हे २ टियर आणि ३ टियर शहरांमध्ये सुरू होत आहेत. शेतीपासून ते अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रांपर्यंत स्टार्टअपची व्याप्ती आता वाढत आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

कोरोना महासाथीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ‘लोकलसाठी व्होकल’ होण्याचं आवाहन केलं होतं. तसंच आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे असंही ते म्हणाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील संबलपूर येथील आयआयएमच्या कॅप्सच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरातील आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

देशातील नव्या क्षेत्रांमध्ये नवे अनुभव घेऊन बाहेर पडणारे मॅनेजमेंट तज्ज्ञ भारताला एका उंचीवर घेऊन जाण्यात मोलाची भूमिका निभावतील. भारतानं कोरोना महासाथीच्या संकटादरम्यानही गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक यूनिकॉर्न दिले आहेत. गेल्या दशकामध्ये भारतानं एक नवा ट्रेंड अनुभवला आहे. बाहेरील अनेक मल्टी नॅशनल कंपन्या भारतात आल्या आणि भारताच्याच भूमिवर त्यांनी विकासही केला. हे दशक आणि हा काळ भारतात नव्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या निर्मितीचा आहे. असंही त्यांनी नमूद केलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!