Share

सोनू सूद उतरणार राजकारणाच्या मैदानात?

Published On: 

मुंबई : करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. अशीच मदतीचा हात अभिनेता सोनू सूदने पुढे केला. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे.

मात्र, लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत करत होता त्यावेळी अनेक राजकारणी लोक देखील त्याला भेटत होते आणि अनेक राजकीय पक्षांकडून त्याला ऑफर आल्या होत्या. यामुळे एक चर्चा अशी होती की, तो राजकारणात प्रवेश करणार आहे. मात्र, यासर्वांवर आता सोनू सूदने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या एका वृत्तानुसार सोनू सूद म्हणाला की, एक अभिनेता म्हणून मला अजून खूप पुढे जायचे आहे. मी जी स्वप्ने पाहिली ती अजूनही पूर्ण झालेली नाहीत आणि मला असे वाटते की, मी प्रथम ते पूर्ण करणे आवश्यक आहे. राजकारणात येण्यासाठी कुठलाही विशिष्ट वेळ ठरलेला नसतो आणि राजकारणामध्ये येण्याचा विचार मी 5 किंवा 10 वर्षांनंतर करेल.

पुढे सोनू सूद म्हणाला की, मला वाटते की ज्या गोष्टींमध्ये मी एक्सपर्ट आहे त्या गोष्टी मी अगोदर केल्या पाहिजेत आणि मी त्याला न्याय देऊ शकतो. मी जर सध्याच राजकारणात प्रवेश केला तर गावोगावी जाऊन लोकांना मदत करू शकणार नाही. म्हणून मी आताच राजकारणात प्रवेश करणार नाही कारण मी त्या पदाला सध्या न्याय देऊ शकत नाही. आता एक अभिनेता म्हणून खूप काही करायचे राहिले आहे आणि आता मी ते करण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!