टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत देशाने भाजपला दिलेल्या घवघवीत यशानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघात आपल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी धन्यवाद रॅली काढत मतदारांचे आभार मानणार असून मोदी बाबा विश्वनाथ आणि कालभैरवाचं दर्शन घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाला पुन्हा एकदा देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. यावेळी मोदींच्या असलेल्या सुप्त लाटेने विरोधकांना चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मतदार जनतेने भाजपप्रती दाखवलेल्या विश्वासाचे आभार मानण्यासाठी नरेंद्र मोदी शपथविधी पूर्वीच वाराणसीतील जनतेचे आभार मानणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोदी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेणार आहेत. पोलीस लाईन ते विश्वनाथ मंदिरामधील सात किमीचं अंतर ते बंद गाडीतून पार करणार आहेत. हा एक रोड शो असून यानंतर नरेंद्र मोदी समर्थकांना संबोधित करणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
