Share

पंतप्रधान मोदींनी पाठवलं पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना पत्र !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंतप्रधान झाल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २०१५ साली अचानक मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. त्यावेळी मोदींचा हा काही तासांचा अनियोजित दौरा चांगलाच चर्चेत आला होता.

त्यांनतर 2017 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पनामा पेपर्स प्रकरणातमध्ये खुलासा करण्यासंदर्भात पंतप्रधान शरीफ यांना पदावरून दूर केले होते. त्यांनतर 2018 मध्ये, पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने शरीफ यांना सार्वजनिक पद धारण करण्यास अपात्र ठरविले आणि त्याला उत्तरदायित्वाच्या कोर्टाने दहा वर्षे तुरूंगवासाची शिक्षासुद्धा सुनावली होती.

त्यांनतर आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पत्र पाठवलं आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय पंतप्रधानांचे हे पत्र इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालय कार्यालयाने नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांच्याकडे सूपूर्द केलं आहे.

नवाज शरीफ यांच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी शरीफ यांचं सांत्वन करण्यासाठी हे पत्र लिहिलं आहे. नवाज शरीफ यांची आई बेगम शमीम अख्तर यांचे २२ नोव्हेंबर रोजी निधन झालं. मोदींनी हे पत्र २७ नोव्हेंबर रोजी पाठवलं होतं. या पत्रासंदर्भात नवाज यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) या पक्षाने गुरुवारी खुलासा केला आहे.

डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हे पत्र मागील आठवड्यामध्ये भारतीय उच्चायुक्तांनी शरीफ यांची मुलगी आणि पीएमएल-एनच्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांना पाठवलं आहे. तसेच या पत्रासंदर्भात मरियम यांनी लंडनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नवाज शरीफ यांना माहिती द्यावी अशी विनंतीही भारतीय उच्चायुक्तालयाने केलीय.

या पत्रामध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, “प्रिय मिया साहिब, २२ नोव्हेंबर रोजी लंडनमध्ये तुमची आई बेगम शमीम अख्तर यांचं निधन झाल्याचं वृत्त समजलं. हे ऐकून खूपच दु:ख झालं. या दु:खद प्रसंगी माझ्या सद्भावना तुमच्या सोबत आहेत,” असं म्हटलं आहे.

२०१५ मध्ये पंतप्रधान मोदींनी लाहोर येथे नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. त्यावेळीच्या आठवणींना उजाळा देताना मोदींनी बेगम शमीम अख्तर यांचा हसरा चेहरा आणि उत्साहाने केलेलं स्वागत खूपच हृदयस्पर्शी होतं, असंही पत्रात नमूद केलं आहे. बेगम शमीम अख्तर यांच्या निधनामुळे तुमच्या कुटुंबाचे जे नुकसान झालं आहे आणि तो धक्का तुम्हाला बसला आहे तो सहन करण्याची ताकद तुम्हाला परमेश्वर देवो, अशी प्रार्थना मी करतो, असंही मोदी या पत्राच्या शेवटी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!