Share

तृणमूल काँग्रेसला खिंडार; दिग्गज नेते सोडू लागले ममता बॅनर्जी यांची साथ

Published On: 

🕒 1 min read

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वीच आतापासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.पक्षातील मोठ्या नेत्यांपासून स्थानिक पातळीवरील नेते बंडखोरी करून पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, कालच तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर २४ तासातच तृणमूल काँग्रेसला दुसरा हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधील एक आमदार आणि पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाची साथ सोडत राजीनामे दिले आहेत.

शुक्रवारी पक्षाचे आणखी एक आमदार शिलाभद्र दत्ता यांनी पक्षाचा राजीनामा दिला. शिलाभद्र दत्ता 24 परगणा जिल्ह्यातील बैरकपूर येथून आमदार आहेत. शिलाभद्र दत्ता यांनी आपला राजीनामा पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पाठवला. याशिवाय तृणमूल काँग्रेसचे गोबिंदपूर-महेशपूर, बामोण गोला, पकुआ हट, जोग्गोडोल आणि चांदपूर येथील अध्यक्षांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.

जिल्हाध्यक्ष मोसम नूर आणि जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांच्याकडे त्यांनी राजीनामे सुपूर्द केले आहेत.पक्षामध्ये सन्मान मिळत नसल्याने लोकांची कामे करता येत नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचे कारण या नेत्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!