पटना – प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले अहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालूनही त्यांचा सर्रास वापर सुरू आहे. या पिशव्यांना अटकाव करण्यासाठी यंत्रणा प्रभावी काम करताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर बिहार साकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे.
नुकतीच नितीश सरकारची मंत्रिमंडळ बैठक संपली आहे. या दरम्यान राज्य सरकारने 6 मोठे निर्णय घेतले आहेत. यात बिहारमध्ये सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. आता बिहारमध्ये प्लास्टिकची आयात, निर्यात, साठवण, उत्पादन आणि वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.फक्त प्लास्टिक नव्हे तर थर्माकोल देखील बंदीच्या कक्षेत आणले गेले आहे.
या बैठकीनंतर पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव दीपक सिंह म्हणाले की, प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हे लक्षात घेता, आयात करण्याबरोबरच कोणत्याही प्रकारचे उत्पादन, वाहतूक, साठवण इ. बंदी घालण्यात आली आहे. ते म्हणाले की, बुधवारपर्यंत याची अधिसूचना दिली जाईल. शिक्षेच्या तरतुदीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
दरम्यान, या निर्णयामुळे प्लास्टिकचा प्रसार होण्यास अटकाव होऊन प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने दमदार पाऊल पडेल. असा विश्वास बिहार सरकारला वाटत आहे. काही उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. मात्र विविध गोष्टींना वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला सरकारने कुठलाही ठोस पर्याय अद्याप दिलेला नाही यामुळे काहीसा संभ्रम देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात देखील प्लास्टिक बंदी करण्यात आली होती मात्र राज्यात हा निर्णय काहीसा फसला असल्याचे दिसून येत आहे. सध्या राज्यात प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. या पिशव्या वापरून झाल्यावर लोक त्या कुठेही टाकून देतात. परिणामी त्या ड्रेनेज लाइनमध्ये अडकून पाणी तुंबण्यासारखी समस्या निर्माण होते. त्यामुळे या पिशव्यांवरील बंदीच्या अंमलबजवणीचे काय झाले असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?
- ‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

