Share

चिकलठाणा येथे होणार पिटलाईन; खा. कराड, दानवेंसह जलील यांचे ‘विशेष’ प्रयत्न!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : चिकलठाणा येथे पिटलाईन तयार करण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. निधीसाठी अर्थ विभागाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच पिटलाईन तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासाठी सात हेक्‍टर जागा निर्माण करावी लागणार असल्याचे नांदेड विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी सांगितले.

औरंगाबादला पिटलाईन व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या प्रकरणात रेल्वे ग्राहक समितीचे माजी सदस्य मंगेश कपोते यांनी याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी तत्कालीन नांदेड रेल्वे विभागाचे व्यवस्थापक डॉ. ए. के. सिंह यांच्या काळात चिकलठाणा येथे ही प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र कमी जागा असल्याने हा प्रस्ताव नंतरच्या काळात रद्द करण्यात आला होता. लोकप्रतिनिधीही पाठपुरावा सुरू केला होता. खासदार इम्तियाज जलील यांच्यासह खासदार भागवत कराड यांनीही याबाबत प्रयत्न सुरू केले होते.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळाली. कराड यांच्या पाठपुराव्यानंतर नांदेड विभागाने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला याबाबत औरंगाबाद रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेले नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी पत्रकारांना माहिती दिली. नांदेड विभागाकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात पीट लाईनसह साईड लाईनचा चिकलठाणा येथे प्रस्ताव देण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती उपिंदर सिंग यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!