🕒 1 min read
बंगळुरू: लखनऊ सुपर जायंट्सने शनिवारी बेंगळुरू येथे सुरू असलेल्या आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये आवेश खानला १० कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. आवेशला दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केले नव्हते. त्याने गेल्या हंगामात १६ सामन्यांत २४ विकेट्स घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसरे स्थान पटकावले होते. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी १० कोटीत गेलेला अविश आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू बनला आहे.
२०२१ मध्ये कृष्णप्पा गौथमला चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने ९.२५ कोटीत घेतले होते. मेगा ऑक्शनसाठी आवेशची बेस प्राईस केवळ २० लाख होती. आवेश सोबतच शाहरुख खान हा तामिळनाडूचा क्रिकेटपटू आहे. जो गेल्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळला होता. त्याला पंजाब किंग्सने शनिवारी ९ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. ऑक्शनसाठी शाहरुखची मूळ किंमत ४० लाख रुपये होती. मात्र तो त्याच्या मूळ किंमतीच्या विसपट विकला गेला.
उजव्या हाताचा टॉप-ऑर्डर फलंदाज राहुल त्रिपाठी, ज्याची बेस प्राईस ४० लाख होती, तो सनरायझर्स हैदराबादला८. ५० कोटी रुपयांच्या किमतीत विकला गेला. त्याने IPL मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मेगा ऑक्शनच्या पहिल्याच दिवशी अनेक अनकॅप्ड खेळाडू करोडोंमध्ये विकले गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- IPL AUCTION 2022: पाहिल्या दिवसानंतर कोणाकडे बाकी आहे किती पैसे; जाणून घ्या!
- सुरांच्या अप्सरेला वेगळ्या स्मारकाची गरज काय?- संजय राऊत
- “पूर्वी बाळासाहेबांच्या आणि आता लतादीदींच्या स्मारकावरून वाद करणे हे रोगट मानसिकतेचे लक्षण”
- “१० मार्चनंतर महाराष्ट्रात सरकार बदलेल” – चंद्रकांत पाटलांची पुनरावृत्ती
- बाबासाहेबांच्या मूळ गाव आंबडवेतील स्मारक तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे – राष्ट्रपती


