औरंगाबाद : होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दहा शिक्षकांची टीम तयार केली आहे. पालिकेच्या कोविड वॉरमध्ये ही टीम कार्यरत असून दररोज होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांशी फोनवर संपर्क केला जात आहे. एका रूग्णाच्या आरोग्याची सतत दहा दिवस या टीमकडून विचारपुस केली जाणार आहे.
शहरात वाढत्या रूग्णसंख्येमुळे उपलब्ध सरकारी व खासगी रूग्णालयांतील बेड्स अपुरे पडत आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेल्या आणि अतिशय सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांना होम आयसोलेशनद्वारे घरीच उपचार दिले जात आहे.
यासाठी रूग्णाच्या फॅमिली डॉक्टरांकडून किंवा तो राहत असलेल्या संबंधित परिसरातील डॉक्टरांचे प्रमाणपत्र रूग्णाला पालिकेकडे सादर करावे लागते. त्यानंतर संबंधित डॉक्टरकडूनच या रूग्णांना आवश्यक औषधी व उपचार दिले जातात. तसेच त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे का, याविषयी रोजची विचारपुस पालिकेच्या यंत्रणेकडून केली जाते.
याबाबत पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले की, होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी पालिकेच्या कोविड वॉररूममध्ये दहा शिक्षकांची नियुक्ती केली आहे. या दहा शिक्षकांच्या टीमकडे होम आयसोलेशन रूग्णांचा मोबाइल क्रमांकासह डाटा दिलेला आहे.
त्यानुसार रोज संबंधित रूग्णांची संपर्क करून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली जात आहे. यात काही रूग्णांत गंभीर लक्षणे जाणवल्यास पालिकेचे पथक त्यांच्या घरी जाते. आवश्यकता भासल्यानंतरच संबंधित रूग्णास कोविड सेंटरमध्ये अॅडमीट केेले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांचाही आकडा फुगत चालला आहे. रविवारी (दि.२१) प्राप्त अहवालानुसार शहरात तब्बल २५०० रूग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सलीम अली सरोवरातील मरण पावलेल्या माशांच्या मृत्यूस जबाबदार कोण? चौकशी सुरु
- बेड्सची संख्या वाढवली पण अडवणूकीच्या मानसिकतेचे काय ?
- उतार वयात इतकी बेइज्जती कुणाची होऊ नये; भाजप नेत्याचा घणाघात
- मिरची व्यापाऱ्याने जयंत पाटील यांना फसवले!
- ‘या’ कारणामुळे खासदार गिरीश बापट यांनी लिहले पंतप्रधान मोदींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

