🕒 1 min read
पुणे : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्याची वाढ वेगाने वाढत आहे. कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
त्यामुळे यावर अटकाव आणण्यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी सरकारकडून देखील योग्य ते उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधितांमध्ये वाढ होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
यातच राज्यातील कोरोना हॉट्स्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाची परिस्थिती भयाण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कोरोना लसीचा पुरवठा वाढवण्याची मागणी गिरीश बापट यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी गिरीश बापट यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. त्याचबरोबर ३० वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरु करावे, असेही या पत्रात सांगण्यात आले आहे. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हे पत्र ट्वीट केलेले आहे.
Make #Pune India's first #COVID19 free city. @BJP4PuneCity elected representatives headed by Hon. @MPGirishBapat ji have written to Hon. PM @narendramodi ji to increase Pune's quota and open-up vaccinations for above 30 yrs to help control the pandemic in the worst hit city
(1/2) pic.twitter.com/ZLDFkW86gU— Siddharth Shirole (@SidShirole) March 22, 2021
गिरीश बापट यांनी पुण्याची कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता कोरोना लसीकरणाची केलेली मागणी हि योग्य असून यावर आता काय निर्णय दिला जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार केंद्रीय मंत्री जावडेकरांची माहिती
- सचिन वाझेसोबत ट्रायडंट हॉटेलमध्ये असणारी ‘ती’ महिला कोण ?
- ‘…म्हणून उद्धव ठाकरे अनिल देशमुख यांना वाचवत आहेत’
- थकीत कर्जदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; लोन मोरॅटोरिम प्रकरणात अंतिम निकाल जाहीर
- कंगनाच्या वाढदिवसाला संस्मरणीय करण्यासाठी ‘थलायवी’च्या टीमने दिले खास गिफ्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

