🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली आहे. यामुळे अनेक नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सत्र सद्या सुरु आहे.
तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुखांवरील आरोप फेटाळून लावले आहेत. ‘कोरोना झाल्यामुळे ६ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत ते रुग्णालयात होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते २७ फेब्रुवारी पर्यंत घरीच विलगीकरणात होते, त्यामुळे सचिन वाझे आणि अनिल देशमुखांची भेट झालीच नाही,’ असा दावा पवारांनी केला होता.
पवारांच्या या दाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच खोडून काढलं होतं.आता, इतर भाजप नेत्यांनी देखील या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी देखील आता शरद पवारांवर टीका केली आहे.
शरद पवार यांचे राजकारण खोटारडेपणाच्या पायावर उभे आहे, अनिल देशमुख प्रकरणात हे पुन्हा एकदा समोर आले.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांनी पुराव्यानिशी त्यांना उघडे पाडले.
उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची.
करावे तसे भरावे! pic.twitter.com/8yZ0TdFEsL
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) March 23, 2021
‘शरद पवार यांचे राजकारण खोटारडेपणाच्या पायावर उभे आहे, अनिल देशमुख प्रकरणात हे पुन्हा एकदा समोर आले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी त्यांना उघडे पाडले. उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची. करावे तसे भरावे!’ अशी टीका सुनील देवधर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- ‘काका..तुम्ही अनिल देशमुखांना कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा तुमचं पितळ उघडं पडणारच’
- ‘…म्हणून उद्धव ठाकरे अनिल देशमुख यांना वाचवत आहेत’
- सचिन वाझेसोबत ट्रायडंट हॉटेलमध्ये असणारी ‘ती’ महिला कोण ?
- फालतू गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर ; मांजरेकरांनी विराटला दिला खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

