मुंबई: IPL 2022 मध्ये सीजनचा चौथा सामना आज म्हणजेच सोमवारी खेळला जात आहे. या सामन्यात, प्रथमच लीगशी संबंधित दोन्ही संघ, लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. लखनऊचे कर्णधारपद केएल राहुलकडे तर हार्दिक पंड्या गुजरातची कमान सांभाळताना दिसत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात नाणे हार्दिक पांड्याच्या बाजूने पडले आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या दोन नवोदित संघांना मैदानात खेळताना पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता आता संपणार आहे. आयपीएल २०२२ चा मेगा ऑक्शन दोन्ही संघांसाठी चांगला गेला. पण लखनऊ संघाबाबत चर्चेला उधाण आणणारे एक वाक्य म्हणजे या संघाने २ शत्रू खेळाडूंचा एकत्रित संघात समावेश केला होता , ते म्हणजे दीपक हुडा (deepak hooda) आणि कृणाल पंड्या (krunal pandya) . आता दीपक हुडा आणि कृणाल पंड्या GT vs LSG मॅचमध्ये एकत्र खेळताना दिसणार आहेत. हे पाहून लोक सोशल मीडियावर खूप मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तसेच कृणाल आणि दीपकवरील मिम्सही व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमदारांना मोफत घरं देण्याला शरद पवारांचा विरोध!
- IPL 2022 : शुबमन गिलनं घेतलेला ‘हा’ कॅच पाहिलात, तर तुम्हाला कपिल देव यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही!
- VIDEO : मॅच सुरू होऊन दोन मिनिटं झाली अन्..! पाहा शमीच्या पहिल्याच चेंडूवर कसा आऊट झाला केएल राहुल!
- “आमचा एकच बसला तर आईचं दूध आठवेल” – तानाजी सावंतांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा
- IPL 2022 GT vs LSG : गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing XI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

