नवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेल दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. यातच आता आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येकी 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत आज पेट्रोल 114.14 रुपये आणि डिझेल 105.12 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे.
भारतीय तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात आज पेट्रोलचे दर 114.47 रुपये आणि डिझेलचे दर 103.81 रुपये प्रति लिटर आहेत. तर दिल्लीमध्ये आज पेट्रोल 108 रुपये 29 पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 97 रुपये 02 पैसे प्रति लिटर झालं आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 108.78 रुपये आणि 100.14 डिझेलपर्यंत किमती वाढल्या आहेत.
ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 5.15 रुपयांपेक्षाही जास्त दराने महाग झाले आहे, तर डिझेलही जवळपास 5 रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत. देशाच्या अनेक शहरांमध्ये यावेळी पेट्रोल दर 120 लीटरच्या जवळपास पोहोचला आहे.
एसएमएसद्वारे तपासा दर-
इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवा.या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घ्या.
महत्त्वाच्या बातम्या
- टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘सरकार आणि समाजाने हवामानाचा धोका समजून घ्यावा अन्यथा…’,’सामना’तून राऊतांचा इशारा
- मोदी कायद्यापेक्षा मोठे नाहीत; पेगाससवरून कॉंग्रेसचा टोला
- किरण गोसावीला अटक करण्यात पुणे पोलीस यशस्वी
- ‘..तर मी राजीनामा तर देईलच पण राजकारणातून संन्यासही घेईल’ : नवाब मलिक

