Share

नव्या संसद भवनाचे काम थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिक दाखल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

अशा सर्व भीषण परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे निवासस्थान आणि नवीन संसद भवनाचे काम देशात बिकट परिस्थिती असतानाही जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयात हे काम थांबवावे, अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली आहे. कोरोनाने थैमान देशात थैमान घातलेले असतानाच दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे निवास्थान, एकाच ठिकाणी सर्व मंत्रालये, उपराष्ट्रपती निवास, एसपीजी मुख्यालय अशा सगळ्या इमारती या सेंट्रल विस्टा अंतर्गत उभारण्यात येणार आहेत.

हे काम कोरोनाचा कहर कायम असल्यामुळे थांबवण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पण, कोरोना कर्फ्यू लागण्यापूर्वी हे काम सुरू झाल्याचे केंद्र सरकाने सांगितले आहे.

दरम्यान, जुन्या संसद भवनात जागेची कमतरता आणि भविष्याच्या दृष्टीने मर्यादा असल्याने नवी इमारत उभारण्यात येत आहे. नवीन इमारत 2022 मध्ये स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनी ‘न्यू इंडिया’ च्या गरजा आणि आकांक्षांशी जुळणारी आहे. या संसद भवनाच्या बांधकामाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला असल्याने सद्या त्यावर स्थगिती असून काही दिवसांपूर्वी मोदींनी या भवनाच्या कामाचे भूमिपूजन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!