🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील महापूरIला कर्नाटकातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस इथले डॉ. अमोल पवार आणि विधिज्ज्ञ सचिन पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेची पहिली सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे.
दरम्यान,सांगली इथल्या पूरग्रस्तांनी संसार उपयोगी वस्तूंच्या मागणीसाठी कर्नाळ रस्त्यावर आज सकाळी ‘रस्ता बंद’ आंदोलन केलं. सांगलीत महापूराच पाणी अनेकाच्यां घरात शिरल्यानं अनेकांच संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे. सांगली महापालिकेच्या वतीनं संसार उपयोगी साहित्य वाटप मोहीम सुरू आहे, मात्र जाणूनबुजून कर्नाळ रस्त्यावरील नागरिकांवर यात अऩ्याय करण्यात आल्याचा आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या
भाजपच्या महाजनादेश यात्रेला जनतेची प्रचंड भीती- धनंजय मुंडे
भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान, म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

