Share

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्याविरोधात याचिका दाखल; मंत्रालयात सत्यनारायण पूजा घातल्याचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात प्रवेश करताना सत्यनारायणाची पूजा घातली असल्याच्या आरोपावरून आता ठाण्यातल्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते धनाजी सुरवसे यांचे म्हणणे आहे कि, “महाराष्ट्र राज्य हे धर्मनिरपेक्ष राज्य असून मंत्रालयासारख्या संविधानिक ठिकाणी अशा प्रकारची पूजा घालणे चुकीचे आहे.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात पहिल्यांदा प्रवेश करताना सत्यनारायणाची पूजा केली असल्याच्या आरोपावरून काही दिवसांपूर्वीही एक निवेदन राज्यपाल यांच्याकडे देण्यात आलं होतं. तर राज्यपालांनी या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ पाऊलं उचलावी, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र या प्रकरणी ठोस पाऊलं उचलली गेली नाहीत. त्यातच आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता न्यायालय काय निर्णय घेणार हे लवकरच कळेल.

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गोटात एकमत झाले आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांची मॅरेथॉन बैठक घेतली. सर्वांच्या सहमतीने मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजप मध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ३५-६५ असा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे आपल्या आमदारांसोबत वन-टू-वन बैठक घेत होते, त्यात हा समझोता झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून २० मंत्रीपदांची मागणी करण्यात आली होती, त्यानंतर भाजपने १५ ते १७ मंत्रीपदे देण्याचे मान्य केले. तर भाजपला २४ ते २५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!